सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवगेळ्या मुद्द्यावरून सतत जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आमनेसामने आले आहे. मुख्यमंत्री सुडाचे राजकारण करत असल्याचा थेट आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू शकते. (Latest Marathi News)
बिग ब्रेकिंग! राजकीय हालचालींना वेग, शिवसेनेतील ‘या’ बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू
आव्हाड बोलताना म्हणाले की, ‘मुंब्रा शहरासाठी आम्ही 10 कोटींचा जो निधी मंजूर केला होता तो एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौका सभी को मिलता है, हे लक्षात ठेवा. मागील २५ वर्षात ठाण्यामध्ये (Thane) इतके पाणी तुंबले नव्हते तितके पण आता तुंबले आहे. नेमके तेच नाले तुंबले आहेत ज्यांची पाहणी एकनाथ शिंदे यांनी केली होती.’
‘नालेसफाई म्हणजे फक्त पैसे खाण्याचा उद्योग आहे. एका दिवसाच्या पाण्याने गरिबांचे संसार वाहून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याचे भान बाळगावे. तसेच ज्यांच्यावर नालेसफाईची जबाबदारी होती त्यांच्यावर फौजदारी गुन्हे करण्यात यावा,’ अशी मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान आव्हाड यांच्या आरोपावर एकनाथ शिंदे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Ashes Series 2023 | ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर
हे ही पहा