खुशखबर! एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, वाचा नवीन दर

Good news! Big reduction in LPG cylinder rates, read new rates

मुंबई : देशात प्रत्येक गोष्ट महाग झाली म्हणजेच सरकारने प्रत्येक गोष्टीला GST लावला आहे. त्यामुळे जनता या महागाईने त्रस्त झाली आहे. दरम्यान सरकारने आता जनतेला दिलासा दिला आहे तो म्हणजे सरकारी तेल कंपन्यांनी व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे.

Abdul Sattar: “ये मीठा है और वो कडू है..” , मेळघाट दौऱ्यावर अब्दुल सत्तारांची विरोधकांवर फटकेबाजी

१०० रुपयांपर्यंत मोठी कपात

१९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात १ सप्टेंबर पासून १०० रुपयांपर्यंत मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवरच झाली आहे .पण १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किंमतीतच उपलब्ध असणार आहे. आजपासून दिल्लीत एक १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ९१.५० रुपयांनी, कोलकात्यात १०० रुपयांनी, मुंबईत ९२.५० रुपयांनी तर चेन्नईमध्ये ९६ रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

१९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या नवीन किंमती –

नव्या दरानुसार व्यावसायिक सिलेंडरमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत १८८५ रुपये, कोलकात्यात १९९५ रुपये, मुंबईत १८४४ रुपये आणि चेन्नईमध्ये २०४५ रुपयांना मिळणार आहे. मागील काही काळापासून एलपीजी सिलिंडरच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. १९ मे २०२२, १ जून २०२२, १ जुलै २०२२, ६ जुलै २०२२ आणि १ ऑगस्ट २०० रोजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आलेल्या आहेत.

दुसऱ्याचं दिवशी का करतात बाप्पाचे विसर्जन? दीड दिवसाचा गणपती म्हणजे नेमकं काय? जाणुन घ्या!

घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही –

सहा जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. किमतींमध्ये इंडेन सिलिंडरची किंमत दिल्लीत १०५३ रुपये, तर कोलकात्यात १०७९ रुपये, मुंबईत १०५२ रुपये आणि चेन्नईमध्ये १०६८ रुपये असेल.म्हणजेच पाहिल्या आहे त्याच किमतीत काहीच बदल करण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *