महाराष्ट्राच्या वर्तुळात एक खळबळ उडवून देणारी बातमी आहे. नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदांमध्ये नाही तर पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. (Latest Marathi News)
हे ही पहा
अजित पवार यांनी दुसऱ्यांदा बंड केले असून आता ते शिवसेना आणि भाजपच्या (BJP) युतीत सामील झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्शवभूमीवर अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सुद्धा राजभवनाकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे देखील राजभवनावर दाखल झाले असून आज सायंकाळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे इतर ९ आमदार देखील शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. जर असे झाले तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मोठा भुकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बापरे! 24 कोटींचा रेडा, सलमान खानसह अनेक सेलिब्रेटींनी लगावली बोली