अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड केल्याने पक्षामध्ये फूट पडली आहे. त्यांनी शिवसेना-भाजपसोबत युती करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली खरी पण कार्यकर्त्यांना आता पक्षामध्ये कोणाची साथ द्यायची यावरून मोठा गोंधळ उडाला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पहिला धक्का बसला आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे आपला खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. (Marathi Latest News)
डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिनचं झालंय, एकनाथ शिंदे यांच वक्तव्य
रविवारी अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार-खासदारांनी हजेरी लावली होती. यात खासदार अमोल कोल्हे हे देखील होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु त्यानंतर कोल्हेंनी ट्वीट करत आपण शरद पवारांसोबत आहोत असे सांगितले. असे असताना आता पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sharad Pawar । “अजित पवारांवर होणार कारवाई”, शरद पवार स्पष्टच बोलले
“ज्यावेळी मी शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली त्यावेळी मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलो नाही. एका विचारधारेवर विश्वास ठेवून मला मतदारसंघातील मतदारांनी निवडून दिले आहे,” असे अमोल कोल्हे स्पष्ट केले आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
हे ही पहा