LPG Cylinder Price । मागील काही दिवसांपासून देशात महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. एकीकडे महागाई वाढत आहे, तर दुसरीकडे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच आता केंद्र सरकारने एलपीजीचे नवीन दर जाहीर केले आहे. त्यामुळे लगेच जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर.
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! टीना अंबानी यांची ईडीकडून चौकशी सुरु
मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपये आहे. तसेच कोलकाता येथे एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपये तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1875.50 रुपये इतकी आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये एलपीजी स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर 1118.50 रुपयांना तर व्यावसायिक 1937 रुपयांना आहे.
केंद्र सरकारकडून अनेक वेळा व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आले आहेत. मागील महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८३ रुपयांनी कपात केली होती. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत घट झाली होती. त्यामुळे एका सिलिंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली होती. आणि एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2028 रुपये होती.
ओडिशातील बालासोर अपघातात चूक नेमकी कोणाची? तपासादरम्यान धक्कादायक माहिती उघड
मागील काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमती जैसे थे आहेत. मार्च महिन्यात एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली तर त्यापूर्वी गेल्या वर्षी ६ जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल केला होता. नवी दिल्लीमध्ये मार्चपर्यंत एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि सध्या तो 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे.