
IMD Weather Updates । उशिरा का होईना देशात मुसळधार पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. ठिकठिकाणी पेरण्याची लगबग सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा काही जिल्ह्यात मुसळाधार पावसाचा (IMD Weather Updates) इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
हवामान खात्याकडून मुंबई (Mumbai), ठाणे, सिंधूदुर्ग, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, अकोला तसेच बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वासिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) तर सातारा, पुणे (Pune), रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑरेंज् अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. त्याशिवाय मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
Ajit Pawar । ठरलं तर मग! अजित पवार-भाजपचा आगामी निवडणुकीसाठी असा असणार जागा वाटपाचा फॉर्म्युला
तसेच सिंधुदुर्ग, बुलढाणा, धुळे आणि वाशिममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळेया भागात पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. परंतु, राज्याच्या काही भागात अजूनही पावसाने पाठ फिरवली आहे. पेरण्या रखडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
Chandrayaan-3 । आनंदाची बातमी! भारताचं सर्वात मोठं मिशन चंद्रयान-3 ‘या’ दिवशी होणार लाँच