
Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनावाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच अंगलट आले आहे. २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या (2019 Loksabha Election) प्रचारादरम्यान ‘मोदी आडनावाचे सर्व चोर आहेत’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावरून भाजप नेते पूर्वेश मोदी (Purvesh Modi) यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात सुरत सत्र न्यायालयात (Surat Sessions Court) बदनामीचा खटला दाखल केला होता. (Latest Marathi News)
“मातोश्रीच्या वहिणींना दोन भाऊ एकत्र येण मान्य आहे का?” ‘या’ नेत्याचा खोचक सवाल
सुरत न्यायालयाकडून राहुल गांधींकडून दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांना अपात्र ठरवले होते. त्यावरून राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात (High Court of Gujarat) धाव घेतली होती. परंतु गुजरात उच्च न्यायालयाने ही याचिका आज फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे.
या खटल्यादरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी गेली असून ती आणखी ८ वर्ष रद्द राहणार आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आता राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आज एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार
हे ही पहा