Sharad Pawar | नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ९ आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले आणि शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. अजित पवार यांच्या बंडानंतर स्वतः शरद पवार (Sharad Pawar) हे मैदानात उतरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
असंही पवार प्रेम! शेतकऱ्यानं चक्क बैलाच्या अंगावर लिहलं “आम्ही साहेबांच्या सोबत”
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिक (Nashik) जिल्ह्यात असून येवला येथील सभेसाठी (Yeola) ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा पावसात भिजले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचं वातावरण बदलणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. या सर्व चर्चा रंगण्याच कारण असं की, 2019 मधील शरद पवारांची पावसातील सभा. ती पावसातील सभा बऱ्याच दिवस चर्चेचा विषय ठरत होती. 2019 च्या सभेत भर पावसात शरद पवार यांनी साताऱ्यात आपलं भाषण सुरु ठेवलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार पावसात भिजल्याने राजकीय समीकरण बदलणार का? अशा चर्चा सुरु आहेत.
मोठी बातमी! कंटनेर आणि एसटीचा भीषण अपघात, महिला प्रवासी गंभीर जखमी
अजूनही मी म्हातारा झालेलो नाही…
शरद पवार यांची येवल्यात सभा सुरु होण्याच्या आधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना जोरदार उत्तर दिल आहे. मी अजून म्हातारा झालेलो नाही, मी वयाच्या 82 व्या वर्षीही काम करू शकतो,असं म्हणत निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी टोला लगावला आहे.
हे ही पाहा –