NCP Crisis । शरद पवार यांना मोठा झटका, कारमधून प्रवास करणारा आमदार अजित पवारांच्या गोटात

Sharad pawar

NCP Crisis । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धक्क्यांवर धक्के बसत आहे. बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवारांचे अत्यंत जवळचे नेते अजित पवारांच्या गटात सामील होत आहेत. बंडानंतर शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास करणारे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. (Latest Marathi News)

दिल्लीत मुसळधार पाऊस, पावसाने तोडले 20 वर्षांचे रेकॉर्ड, IMD ने जारी केला यलो अलर्ट

पक्षामध्ये बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना कोणत्या गटात सहभागी व्हावे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मकरंद पाटील यांचे नाव अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या यादीत घेतले जात होते. अशातच मकरंद पाटील यांनी काल देवगिरी बंगल्यावर जात वाई (Wai), महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांतील पक्षाच्या एकूण अडीचशे कार्यकर्त्यांसह अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. अजित पवार यांनीही त्यांना मंत्रिपद देणार असल्याचे सांगितले जात आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंना मोठा धक्का! खासदारकी येणार अडचणीत?

अजित पवार आणि मकरंद पाटील यांच्यात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बालेकिल्ल्यातच शरद पवारांना हा आणखी एक धक्का मानला जात आहे. याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत पाहायला मिळेल.

Maharashtra NCP Crisis | राजकीय समीकरणे बदलणार? शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले; सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

Spread the love