
राज्य आणि केंद्र सरकार (Central Govt) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central employees) महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. अशातच आता राज्य सरकारने (State Govt) आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होऊ शकते. (Latest Marathi News)
अधिकारी होताच पतीला धोका देणाऱ्या ज्योती मौर्य प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, पतीने थेट केले गंभीर आरोप
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Inflation Allowances) 4% वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे लक्षात घ्या की वाढ एक जानेवारी 2023 पासून लागू केली जाणार आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता देण्यात येत आहे. या दरवाढीनंतर तो 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाच महिन्याची थकबाकीसह जून महिन्याच्या वेतनापासून ते दिले जाणार आहे. याचा फायदा आता राज्यातील 17 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे.
भाजपला पुन्हा मोठे खिंडार! चार माजी नगरसेवक आणि 500 कार्यकर्त्यांनी केला बीआरएसमध्ये प्रवेश
दरम्यान, केंद्र सरकारकडून 3 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता आणि घर भाडे भत्त्यात केलेली वाढ जानेवारी 2023 पासून लागू केली आहे. अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे.