दोन उपमुख्यमंत्र्यानंतर आता दोन उपसरपंच? पठ्ठयाने केली एकनाथ शिंदेंकडे अजब मागणी

CM

अजित पवार (Ajit Pawar) यांनी २ जुलै रोजी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार यांच्यासह इतर ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले आहे. (Latest Marathi News)

IND vs WI । एक जागा, खेळाडू दोन; सिलेक्टर्स कोणाची निवड करणार? वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी भारतीय संघ अडचणीत

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे राज्याचा विकास आणखी वेगाने होईल असा दावा या सरकारकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक गावात देखील दोन उपसरपंच असावेत अशी मागणी वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील मनूर गावातील माजी सरपंचांकडून केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Weather Update । विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात विकासासाठी दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच (Deputy Sarpanch) असावेत, अशी मागणी राजीव सुदामराव साळुंके (Rajiv Sudamrao Salunke) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. सध्या त्यांच्या या मागणीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

अजित पवारांचे बंड फसणार! राज्यात पुन्हा तिसरा भूकंप येणार, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Spread the love