२०१९ नंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा राजकारणात भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासह इतर ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा धक्का बसला आहे. बंडामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्याने राजकारण पुन्हा एकदा चांगलेच ढवळून निघाले आहे.
पाण्यात बुडालेल्या ‘त्या’ तरुणांना शोधण्यासाठी सोडले कॅमेरे, रेस्क्यू टीमला एक मृतदेह शोधण्यात यश
साहजिकच याचा परिणाम पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बारामती (Baramti) तालुक्यावर झाला आहे. तालुक्यात दोन्ही गटातील नेत्यांना तितकेच महत्त्व आहे. आगामी निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार असा सामना पाहायला मिळू शकतो. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.
टोमॅटोसाठी काय पण! भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी ठेवले दोन बाऊन्सर, पहा व्हायरल व्हिडीओ
बोलताना रोहित पवार म्हणाले की, “आगामी काळात बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार अशी निवडणूक होणार नाही. अजितदादा तशी भूमिका घेणार नाहीत. कारण बारामती विधानसभेवर केवळ अजितदादा यांच्याशिवाय दुसरे कोणी निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे अजितदादा यांच्या कुटूंबाच्या बाबतीत तशी भूमिका घेतली जाणार नाही”. त्यामुळे आगामी काळात सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळणार का? या प्रश्नाला पुर्णविराम मिळाला आहे.