मुंबई : मागील काही दिवसांपासून लांबणीवर पडलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.संभाजी नगर मध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली.येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation)राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा सरकाराला रोषाला सामोरे जावे लागले, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha)बैठकीनंतर संभाजीनगरमध्ये देण्यात आला आहे.
यामुळे सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि फडणवीस सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणी सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.राज्य सरकार मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका कधी दाखल करणार, जर सुप्रीम कोर्टात पुन्रहा राज्य सरकार जाणार नसेल तर ही प्रक्रिया नव्याने सुरु कधीपासून करणार आहे असे काही प्रश्न मराठा क्रांती मोर्चाने सरकारला विचारलेले आहेत.
Mumbai: मुंबईत मनसेच्या नेत्यांकडून वृध्द महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
मराठा क्रांती मोर्चाने आत्तापर्यंत राज्यातील चार सरकारे पाहिली आहेत, मात्र अद्यापही अनेक मागण्या प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले आहे.पण आता एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मराठा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. आता त्यांनी मन मोठं करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि मार्गी लावाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात सरकारने आरक्षण कसे टिकवावे, हा सरकारचा प्रश्न आहे. अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. ही चळवळ राजकीय आरक्षणासाठी नाही, तर आर्थिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती असल्याचा दावाही करण्यात आला आहे.छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपतीउदयनारजे हे आदरस्थानी आहेत यात कसलाही वाद नाही, असेही मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांचे नेतृत्व हे इतर कुठल्याही नेतृत्वापेक्षा मोठे आणि वेगळे आहे, असेही सांगण्यात आले आहे.