मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान केला व दुसऱ्याच दिवशी सकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी इडी ची कारवाई होती. हे काय चालले आहे महाराष्ट्रात. हे सगळे इतक्या निर्लज्जपणाने चालू आहे की याला कोणती लाज लज्जा शरम नाही. देशात मात्र दडपशाही चालू आहे. अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर केली. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू व महाराष्ट्राची माती काय असते, मराठी माणसाचा पराक्रम काय असतो. हे अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील काही शिवसैनिक व राजन विचारे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपाल म्हणून काम करणारे भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे मीठ खाऊन मराठी माणसांचा अपमान करणे , संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई होणे हा त्याचाच दुसरा टप्पा आहे. हिंदूमध्ये फूट पाडणे, मराठी – अमराठी लोकांमध्ये वाद निर्माण करून देणे, व यामध्ये मराठी माणसाला चिरडून टाकायचे हे भाजपाचे कट कारस्थान आहे. हिंदूंना आणि मराठी माणसांना ताकद देणारी शिवसेना एकदा संपली की, महाराष्ट्र यांना चरायला मोकळा झाला. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना नाते तोडून जी राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची असा भाजपचा प्रयत्न आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
‘काही लोकांना मातोश्रीनी जरा जास्तच प्रेम दिले होते व त्याच प्रेमाचे काटे आता टोचायला लागली म्हणून आता ते दुसरीकडे गेले. जे गेले ते बर झाले गेले आता सुटतात दिल्लीला पळत. अडीच वर्षात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मुख्यमंत्री म्हणून कोणाचाही धडपण नव्हतं अर्धवट जेवण ठेवून पळावा लागले नाही. काही काळापूर्ती महाराष्ट्रावर अशी परिस्थिती ओढवली आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांच्यावर केली.
आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबरोबर जे झाले त्याचा गुपित फोडण्याचा इशारा यावर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय. पंचवीस वर्षे तुम्ही हे का लपवल. तुम्ही एवढे वर्षे आमदार मंत्री होते कधीही गुपित फोडावेसे नाही वाटले का? हे असे भंपक फक्त धंदे सोडून द्या, अजून खोतकर यांनी त्यांचे दडपण तरी मान्य केले असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.