Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे या दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने सामने येत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांचे (Rohit Pawar) हडपसर भागातील असणाऱ्या जनसंपर्क कार्यालयाला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत कार्यालयाजवळ असणारी सायकल जळाली आहे. (Latest Marathi News)
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शनिवारी मध्यरात्री या कार्यालयाला तिघांनी आग लावली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सुरक्षा रक्षकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयाला आग कशासाठी लावली? आग लावणारे व्यक्ती कोण? याचा तपास सध्या हडपसर पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
पावसाचा कहर सुरूच! कुठे वाहने बुडाली, तर कुठे रस्त्याला भले मोठे खड्डे पडले
दरम्यान, या घटनेवर अजूनही रोहित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासूनच रोहित पवार यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे.
Katrina kaif Birthday | कधीच शाळेत न जाणारी कतरिना आज घेते बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन