कोथिंबीर पिकाच्या शेतीतून शेतकरी बनला लखपती, 6 एकरात कमावले तब्बल 12 लाख रुपये

A farmer became a millionaire from the cultivation of coriander crop, earned as much as 12 lakh rupees from 6 acres

शेतकऱ्यांना (Farmers) सतत अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात त्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अनेकदा त्यांना कवडीमोल भावात शेतीमाल विकावा लागतो. शेतीमालाला (Agricultural) हमीभाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. परंतु मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हणले तर हरकत नाही. (Latest Marathi News)

Asia Cup 2023 | आज होणार महामुकाबला! टीम इंडिया उडवणार पाकिस्तानचा धुव्वा?

कारण राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीमालाचे दर वाढले आहेत. टोमॅटोने शंभरी पार केली आहे. अनेक टोमॅटो (Tomato Price Hike) उत्पादक शेतकरी करोडपती तर लखपती झाले आहेत. त्यापाठोपाठ आता कोथिंबीरीचेदेखील भाव वाढले आहेत. नाशिक येथील एक शेतकरी कोथिंबीर लागवडीतून लखपती झाला आहे.

Weather Update । दिलासादायक! हवामान खात्याने दिला पुण्यासह ‘या’ 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

दररोजच्या जेवणात कोथिंबीरचा वापर केला जातो. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीची लागवड करतात. परंतु त्यांना दरवर्षी चांगले भाव मिळतात असे नाही. जर मागणी जास्त असेल तर शेतकरी झटक्यात लाखोंची कमाई (Coriander Price Hike) करू शकतो. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गोदाकाठ भागातील निफाड तालुक्याच्या तारुखेडले या ठिकाणच्या युवराज एकनाथ जगताप यांनी आपल्या सहा एकर शेतीत कोथिंबीरची लागवड केली होती.

Cows Died । धक्कादायक! विषारी वैरण खाल्ल्याने ४ गाई दगावल्या

त्यातून त्यांना एकूण 12 लाख 51 हजार रुपयाचा फायदा झाला. सर्वात म्हणजे या शेतकऱ्याला विक्रीसाठी बाजारात जावे लागले नाही. त्यांची कोथिंबीर एका व्यापाऱ्याने थेट बांधावर जाऊन खरेदी केली. टोकीता या वाणातून त्याने अवघ्या 45 दिवसात लाखोंची कमाई केली. त्यामुळे जगताप कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Rahul Gandhi | हा लढा भाजपच्या विचारसरणीविरुद्ध, राहुल गांधी यांचा भाजपवर निशाणा

Spread the love