Kirit Somaiya । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावरून चांगलेच अडचणीत आले आहेत. याचे पडसाद काल विधिमंडळात पाहायला मिळाले. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने ठिकठिकाणी आंदोलन केले. आता याच व्हिडिओ प्रकरणी (Kirit Somaiya Viral Video) मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. (Latest Marathi News)
Rain in Maharashtra | राज्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती
आक्षेपार्ह व्हिडीओची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. त्यानंतर आता त्यावर कार्यवाही सुरू झाली असून मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. हा व्हिडिओ कितपत खरा आहे, याचा तपास मुंबई गुन्हे शाखा युनिट 10 करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर टीमची (Cyber Team) मदत घेण्यात येणार आहे.
कोथिंबीर पिकाच्या शेतीतून शेतकरी बनला लखपती, 6 एकरात कमावले तब्बल 12 लाख रुपये
तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाकडून मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यात या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कथित व्हायरल व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
Asia Cup 2023 | आज होणार महामुकाबला! टीम इंडिया उडवणार पाकिस्तानचा धुव्वा?
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोमय्या यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. “काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवण्याचे काम करतात आणि दुसरीकडे आता आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत आहेत असे समोर आले आहे. त्यामुळे आता माता भगिनींना त्रास देणाऱ्या सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का?” असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.
Weather Update । दिलासादायक! हवामान खात्याने दिला पुण्यासह ‘या’ 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट