दिल्ली : आज INS विक्रांत भारतीय नौदलात सामिल झाली आहे. ही नौकेला तयार होण्यास तब्बल 13 वर्षे लागली. त्यामुळे आजचा हा दिवस भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. विशेष म्हणजे ही भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून नौदलात सामील केली. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं आहे. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली.
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह आज ‘हे’ मंत्री पुण्यात येणार, या कामाचं करणार उद्घाटन
आता प्रश्न पडला असेल ब्रिटीश राज कस काय? कारण याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणार आहे आणि हेच भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करताना सांगितले की, त्या चिन्हावर सत्यमेव जयते आणि नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे.
Subodh Bhave: पुणे मेट्रो संदर्भात केलेली सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
आजपासून नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल आणि हा नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे विक्रांत. भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत. कितीही मोठं आव्हान असो भारतासाठी काहीही अशक्य नाही. INS विक्रांत अमृत महोत्सवातील अतुलनिय अमृत आहे.
पीएम मोदींचे ट्विट
पीएम मोदींनी अधिकृत ट्विटरवर पोस्ट केले की, “संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. पहिले स्वदेशी बनावटीची आणि तयार केलेली विमानवाहू जहाज INS विक्रांत कार्यान्वित होणार आहे. नवीन नौदल चिन्हाचेही अनावरण केले जाईल.”