अभिमानास्पद! इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या मदतीला निघाला ‘लालबागचा राजा’

Proud! 'King of Lalbagh' came to help the villagers of Irshalwadi

राज्यात पावसाने (Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने (Heavy rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने इर्शाळवाडीत (Irsalwadi) माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री खालापूरजवळील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहे. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती होती. अजूनही या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

या दुर्घटनेत 16 जणांचे बळी गेले असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. या गावातील लोकांना सुरक्षित घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील वाचलेल्या लोकांच्या मदतीला लालबागचा राजा धावला आहे. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, अन्नपदार्थ आणि सर्व जीवनाश्यक वस्तू दिल्या जाणार आहे.

Maharashtra rain । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी

दरम्यान, आज सकाळी 10 वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणाहून इर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून मृतांना आणि जखमींना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळानेदेखील मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

आक्रोश आणि फक्त आक्रोश; इर्शाळवाडी या ठिकाणी भयानक स्थिती

Spread the love