खालापूरच्या (Khalapur) इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली आहे. या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या गावात (Irshalwadi) 50 ते 60 घरांची वस्ती होती. त्यापैकी फक्त दहा ते बारा जण वाचले आहेत. या दुर्घटनेत (Khalapur Landslide) 16 जणांचे बळी गेले असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत. या गावातील लोकांना सुरक्षित घटनास्थळी नेले आहे. (Latest Marathi News)
मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या चार नराधमांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या ठिकाणी अजूनही मदतकार्य सुरू आहे. या गावातील एकूण 150 लोकांचा शोध लागत नसल्याने हे लोक ढिगाऱ्याखाली दबले तर नसतील ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांपैकी 13 जणांची ओळख पटली असून तीन जणांची ओळख पटली नाही. मृतांमध्ये पारधी आणि भवर कुटुंबातील सर्वात जास्त सदस्यांचा समावेश आहे.
अभिमानास्पद! इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांच्या मदतीला निघाला ‘लालबागचा राजा’
त्याशिवाय जखमींना उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात तर काहींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जखमींपैकी कुणाचीही प्रकृती गंभीर नाही. या ठिकाणी पाऊस पडत असून सर्वत्र चिखल झाला आहे. अशातच मोठ्या मशिन्स वर जात नाहीत, त्यामुळे एनडीआरएफला बचावकार्य करत असताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.