Indonesia । फिट राहण्यासाठी सर्वजण आपल्याला जिमला जाताना दिसत आहेत. जिम करत असताना अनेकजण जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करतात. मात्र जास्त वजन उचलणे जीवावर देखील बेतू शकते. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जास्त वजन उचलण्याच्या नादात जिम ट्रेनरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडोनेशियामधील ३३ वर्षीय फिटनेस इन्फ्लुअन्सर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, जिममध्ये २१० किलो वजनाचा बारबेल उचलत असताना मानेमध्ये दुखापत होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १५ जुलै रोजी घडली आहे. घटनेच्या दिवशी जस्टिन इंडोनेशियातील बाली येथील पॅराडाईज जिममध्ये व्यायाम करत होता. त्याच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. (Indonesia News )
जस्टिन विकी हा २१० किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याची मान मोडली त्याचबरोबर हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्या महत्त्वाच्या स्नायूंमध्ये गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली मात्र यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याबाबतचं वृत्त ‘न्यूज एशिया’ने दिलं आहे.
Mahindra Thar । भन्नाट ऑफर! अवघ्या 25000 रुपयांत खरेदी करा महिंद्रा थार