
Rohit Sharma’s World Record । भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मैदानात तो अनेक विक्रमाला (Rohit Sharma Record) गवसणी घालतो. या भारतीय कर्णधाराने अनेक इतिहास रचले आहे. अनेकदा त्याने दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडला आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना (India and West Indies) सुरु आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजांना त्याने चांगलेच धुतले आहे. (Latest Marathi News)
Monsoon session । रोहित पवार भर पावसात एकटेच बसले आंदोलनाला, केली ‘ही’ मागणी
रोहितने या सामन्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली असून विशेष म्हणजे आतापर्यंत हा विक्रम कोणत्याही खेळाडूला जमला नाही. त्याने अवघ्या ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शिवाय आपल्या नावे अनेक विक्रम देखील केले आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्याने स्वतःचा विक्रम मोडला आहे. २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत ४७ चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. (Latest Sports News)
रोहित हा या स्पर्धेत २००० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला असून आयसीसीने (ICC) नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये त्याने अव्वल १० फलंदाजांच्या यादीत स्थान पटकावले आहे. असा विक्रम करणारा रोहित शर्मा हा भारताचा एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Ajit Pawar । आमदारांच्या निधी वाटपात ‘दादा’गिरी? अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…