
Gyanvapi Case । ज्ञानवापी मशीद (Gnanavapi Masjid) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. कारण ही मशीद खरंच मंदिरावर बांधली आहे की नाही हे शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या पथकाने (Archaeological Survey of India Team) सोमवारी सर्वेक्षण सुरू केले. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) २६ जुलै सायंकाळी ५ वाजे पर्यंत करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले आहे. (Latest Marathi News)
एएसआयची (ASI) ३२ जणांची टीम सकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वेक्षणासाठी ज्ञानवापीमध्ये पोहोचली. त्याशिवाय हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना देखील या सर्वेक्षणात सामील होण्याची परवानगी दिली न्यालयाकडून देण्यात आली होती. परंतु आज अचानक न्यायालयाने सर्वेक्षण करू नये असे महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Jayant Savarkar । मनोरंजन विश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड
दरम्यान, मागील वर्षी मे महिन्यात ज्ञानवापी संकुलाच्या व्हिडिओग्राफिक सर्वेक्षणात मशिद परिसरात ‘शिवलिंग’ आहे असा मोठा दावा हिंदू पक्षाने केला होता. तर मुस्लीम पक्षाने ही रचना फक्त कारंजे असल्याचा दावा केला होता. परंतु याप्रकरणी ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने या सर्वेक्षणावर आक्षेप घेतला असून सर्वेक्षणामुळे मशिदीचे नुकसान होण्याचे त्यांनी मत मांडले आहे.