Viral Video । धबधब्यातील दगडावर उभा राहून तरुण रील बनवत होता; तेवढ्यात पाय घसरला अन् घडलं भयानक; व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Standing on a rock in the waterfall, the young man was making a reel; Then the foot slipped and a terrible thing happened; You will be shocked after watching the video

Viral Video । राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अनेकजण निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी फिरायला जात आहेत. परंतु हेच काहींच्या अंगलट येत आहे. काही पर्यटक जाणूनबुजून चुका करत आहेत आणि त्यांची हीच चूक त्यांच्या अंगलट येत आहे. सध्या तरुणाईमध्ये रील (Reel) बनवण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

Mumbai News : बाळ नाल्यात पडलं त्यावेळी नेमकं काय घडलं? आजोबांनी सांगितला अंगावर काटा आणणारा क्षण

रीलच्या नादात कोण काय करेल याचा काही नेम नाही. एका तरुणाला रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कर्नाटकमधील कोल्लूरजवळील आहे. हा तरुण अरसीनागुंडी धबधब्यातील दगडांवर उभे राहून व्हिडिओ शूट करत होता. परंतु अचानक त्याचा पाय घसरला आणि तो काही क्षणातच जोरदार पाण्यात वाहून गेला. (Latest Viral Video)

Mumbai landslide । लोक झोपेत असतानाच इमारतीवर कोसळली दरड, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

दरम्यान, सोशल मीडियावर (Social media) या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. परंतु अजूनही या तरुणाचा शोध लागला नाही. याप्रकरणी कोल्लूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Havaman Andaj : मोठी बातमी! राज्यभर पावसाचा जोर अजून वाढणार; नेमकं काय आहे कारण?

Spread the love