देशात सतत भ्रष्टाचाराच्या (Corruption) घटना समोर येतात. धक्कादायक बाब म्हणजे गलेगठ्ठ पगार असणारे अधिकारी सर्रास लाच घेतात. त्यामुळे गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात लूट होते. अनेकदा हे लाचखोर अधिकारी (Bribery officials) लाच घेत असताना रंगेहाथ सापडतात, तरीही लाच घेण्याचे प्रमाण कमी झाले नाही. तुम्ही बऱ्याचदा लाच घेतल्याचे ऐकले असेल परंतु एका तलाठ्याने (Talathi) लाच चक्क गिळली आहे. (Latest Marathi News)
Government scheme । आनंदाची बातमी! ५०% अनुदानावर आजच करा शेळीपालन, काय आहे योजना? जाणून घ्या
एक तलाठी लाच घेत असताना लोकायुक्त टीमच्या हाती लागला, परंतु त्याने भीतीपोटी चक्क पैसे गिळाले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. ही धक्कदायक घटना मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात घडली आहे. बिलहरीतील तलाठी गजेंद्र सिंह यांनी जमीनीच्या एका प्रकरणात चंदन सिंह लोधी यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
Chanakya Niti । शत्रूवर सहज विजय मिळवायचा असेल तर आचार्य चाणक्यांच्या लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
त्यावरून लोधी यांनी जबलपूरमधील लोकायुक्तांकडे तक्रार दिली. तक्रारीवरून लोकायुक्तांची टीमने घटनास्थळी धाव घेत गजेंद्र सिंह यांना लाच घेत असताना रंगेहात पकडले. परंतु गजेंद्र यांनी लगेचच 500 रुपयांच्या एकूण 9 नोटा तोंडात चावून गिळल्या. त्यानंतर या टीमने त्यांच्या तोंडातील नोटा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नोटा न निघाल्याने सिंह यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.