शेतकऱ्यांना (Farmers) शेती करताना अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त शेतीवरच अवलंबून राहून जमत नाही. शेतकरी शेतीसोबत इतर व्यवसाय करतात. त्यापैकी एक व्यवसाय म्हणजे पशुपालन (Animal husbandry) होय. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. (Latest Marathi News)
बऱ्याचदा शेतकऱ्यांना या व्यवसायात पाहिजे तसे उत्पन्न घेता येत नाही. यामागचे कारण म्हणजे कमी दूध आणि दुधाला नसणारे भाव. या दोन समस्यांमुळे शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय परवडत नाही. परंतु शेतकऱ्यांची आता ही समस्या दूर होणार आहे. कारण बाजारात लवकरच सुपर फूड (Super food) येणार आहे. ज्यामुळे जनावरांच्या खाद्याची समस्या दूर होईल शिवाय जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढेल.
IVRI ने (IVRI) दिलेल्या माहितीनुसार या खाद्यपदार्थामुळे जनावरांची प्रजनन क्षमता तसेच त्यांची प्रतिकारशक्ती आणि दूध देण्याची क्षमता वाढेल. कारण या खाद्यपदार्थात फायटो-न्यूट्रिएंट्स आणि पोषण मोठ्या प्रमाणात असते. महत्त्वाचे म्हणजे हे फायटो-पोषक वनस्पतींत आढळून येते. सर्वात आनंदाची बाब म्हणजे हे खाद्यपदार्थ कोणत्याही रसायनाशिवाय नाही तर वनस्पतींपासून तयार करण्यात आले आहे. या आहारामुळे जनावरांना अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवता येईल. साहजिकच जनावरांना कोणताही आजार होणार नाही.
Yuvraj Singh । प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहच्या आईला धमकी, 40 लाख रुपये द्या नाहीतर… ‘
याबाबत एमिल फार्मास्युटिकल्सचे संचालक डॉ.इक्षित शर्मा यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, या आहारामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढेल आणि त्यामुळे पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होईल. शिवाय जनावरांच्या आजारावर खर्च कमी होऊ शकतो. शेतकऱ्यांनी जर हा आहार दिवसातून एकदा जनावरांना दिला तर त्याचा त्यांना फायदा होईल.
Kolhapur Flood | ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये पूरस्थिती? पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ
शेतकऱ्यांच्या फायद्याचे असणारे लवकरच हे सुपर फूड बाजारात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे आयव्हीआरआयकडून हा आहार तयार करण्यासाठी मैदानी भागातील जनावरांवर संशोधन करण्यात आले होते. त्यांच्या या संशोधनात हा आहार सध्या उपलब्ध असणाऱ्या आहारांपेक्षा चांगला आणि अधिक प्रभावी असल्याचा दावा केला आहे. जे जनावरांना चाऱ्यात मिसळून खाऊ घालता येते.