
Tomato Price Hike । राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थैमान (Heavy Rain in Maharashtra) घातले आहे. परंतु याचा फायदा टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. यंदा टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे. टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे नशीब पालटले आहे. (Latest Marathi News)
Prabhas । मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचं फेसबूक पेज झालं हॅक
नाशिक जिल्ह्यातील धुळवड गावातील एकूण 12 शेतकऱ्यांना टोमॅटोने करोडपती तर 55 लखपती केले आहे. डोंगरी भागामध्ये असणारे हे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबले होते. त्यामुळे टोमॅटोने त्यांच्यावरील हे संकट दूर केले आहे. मुरमाड जमिनीमध्ये दरवर्षी हे शेतकरी मेथी, कोथिंबीर,कोबी, टोमॅटो आणि कांदा यांसारख्या पिकांचे उत्पन्न घेत असतात.
जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने टेकड्यांचे सपाटीकरण करून त्यात पिकांसाठी योग्य असणारी माती टाकली जाते. लाखो रुपये खर्च करूनही त्यांना दरवर्षी कवडीमोल दरात भाज्यांची विक्री करावी लागते. तरीही हार न मानता यावर्षी या गावातील एकूण 125 शेतकऱ्यांनी सहाशे एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. मार्च ते एप्रिल दरम्यान टोमॅटोला चांगला दर (Tomato Rate) नव्हता.
परंतु मागील महिन्यापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या गावातील १२ शेतकरी कोट्याधीश बनले आहेत. तसेच 55 शेतकऱ्यांनी 50 लाखांचा टप्पा पार केला असून अनेकजण लखपती झाले आहेत. दरम्यान, आणखी काही दिवस या किमती जैसे थे राहणार असल्याचे बोलले जात आहे.
हे ही पहा