Agriculture News । दिलासादायक बातमी! आता 5 गुंठ्यांचीही होणार खरेदी-विक्री, असा करा अर्ज

Good news! Now 5 knots will also be bought and sold, apply for this

Agriculture News । सोलापूर : देशातील अनेक शेतकऱ्यांना खूप जमिनी (Land) आहेत तर अनेकांना थोड्या प्रमाणात जमिनी आहेत. यातील काही शेतकरी जमिनी जास्त असल्याने त्यांची विक्री करतात तर काहीजण आणखी जमीन खरेदी करतात. केंद्र (Central Government) आणि राज्य सरकार (State Government) सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत असते. नुकताच राज्य सरकारने जमिनीबाबत एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

हे ही पहा

नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता विहीर, रस्ता आणि वैयक्तिक घरकुलासाठी (500 चौरस फूट) तुकडेबंदीतुन सवलत देण्यात आली आहे. 1961 मधील महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम आणि कुळवहीवाट कायद्यामधील तरतुदी तसेच नियमानुसार आता जिल्हाधिकाऱ्यांना पाच गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीला (Buy and sell five gunthas of land) परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Tomato Price Hike । टोमॅटोने बदलले नशीब! ‘या’ गावातील 12 शेतकरी बनले करोडपती तर 55 लखपती

विहिरीसाठी कमीत कमी दोन गुंठे जमीन हस्तांतरण मंजूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून त्यांनी मंजुरी दिल्यानंतर त्यांचा आदेश विक्री दस्तासोबत जोडावा लागेल. त्यांनतर विहीर वापरासाठी मर्यादित असा शेरा असणारी नोंद सातबाऱ्यावर घेतली जाईल. घरकुलासाठी 500 चौरस फुटांपर्यंतची जमीन हस्तांतर करण्यास जिल्हाधिकारी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास अभिकरणाकडून लाभार्थ्याची खात्री करण्यात येईल. त्यानंतर याचा लाभ लाभार्थ्याला घेता येईल.

Prabhas । मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता प्रभास याचं फेसबूक पेज झालं हॅक

तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी आदेशात शेत रस्त्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रस्तावित जमिनीच्या भू-सहनिर्देशकाचा समावेश असणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा असा मंजुरी आदेश जमिनीच्या विक्री दस्तासोबत जोडावा लागणार आहे. परंतु हे लक्षात घ्या की जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी फक्त एक वर्षासाठीच असेल. दरम्यान, अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ मिळेल. या काळात कार्यवाही अपेक्षित आहे, जर ती झाली नाही तर तो आदेश रद्द केला जाईल.

Ajit Pawar । पक्षावर दावा सांगण्यासाठी अजित पवार उतरले मैदानात, पदाधिकाऱ्यांना दिलं प्रतिज्ञापत्राचं टार्गेट

Spread the love