Manipur Violence । मणिपूरमध्ये (Manipur) मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत चांगलाच घेराव घातला आहे. या प्रकरणी सीबीआयही (CBI) अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीबीआयकडून हिंसाचार आणि कट केल्यासंबंधीत एफआयआर (FIR) दाखल करून या प्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
भारीच की राव! टोमॅटो नाही तर आलं लावून शेतकरी बनला कोट्यवधी रुपयांचा मालक
तर दुसरीकडे या प्रकरणी मणिपूर महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. या महिला हातात मशाल घेत सुरक्षा रक्षकांसह रात्री रस्त्यावर उतरल्या आहेत. या आंदोलनाला मीरा पैबी (Meera Paibi) असे म्हटलं जाते. या आंदोलनात मैतेई (Maitei) समाजातील महिला सहभागी झाल्या असून मणिपूरमध्ये या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीवर उपाय निघत नसेल तर या महिला नग्न आंदोलनाची धमकी देतात. त्यापुढे सुरक्षा दल आणि लष्कराचे जवान हतबल होतात.
३ मे पासून मणिपूर धगधगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) २० जुलै रोजी या प्रकरणाची दखल घेतली असून न्यायालयाने मणिपूर सरकारला (Manipur Govt) तात्काळ योग्य पावले उचलून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.
Rain Update : चंद्रपूरमध्ये पुरस्थिती, मोठं मोठे बंगले बुडाले पाण्यात; समोर आले धक्कादायक फोटो
हे ही पहा