ऑगस्ट महिन्यामध्ये 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. या संदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी मोठी माहिती दिली आहे. त्यामुळे आयबीआयकडून ग्राहकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. ग्राहकांनी बँके संबंधित काही काम असेल तर ते नियोजन करून करावे. कारण की ऑगस्ट महिन्यात 14 दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत असा अहवाल आरबीआय कडून करण्यात आला आहे. (Bank Holiday)
आरबीआय सतत बँकांसंबंधी अपडेट जारी करत असतात. आता देखील आरबीआयने बँकांना सुट्टी असलेली सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात अनेक राज्यात सण साजरे करण्यात येत आहेत त्यामुळे ऑगस्टमध्ये जास्त सुट्ट्या असल्याचे बोलले जात आहे.
शेतजमिनीवर घर बांधत असाल तर थांबा नाहीतर पाडावे लागले घर; पाहा नियम काय सांगतो
पाहा सुट्ट्यांची यादी
6 ऑगस्ट रोजी रविवारीमुले बँक बंद असतील.
8 ऑगस्ट रोजी गंगटोकमध्ये तेन्दोंग ल्हो रम फात मुळे बँकेला सुट्टी असेल
12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारी बँका बंद असणार.
13 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकेला सुट्टी.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने बँकांना सुट्टी असेल
16 ऑगस्ट रोजी पारसी नववर्ष असल्याने मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँक बंद असतील.
18 ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथीमुळं गुवाहाटीमध्ये बँका बंद असतील.
20 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
26 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार असल्याने संपूर्ण देशामध्ये बँका बंद राहतील.
27 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी राहील.
28 ऑगस्ट रोजी ओणममुळं कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद असतील
29 ऑगस्ट रोजी तिरुओणममध्ये कोच्चिमध्ये बँका बंद राहतील
30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळं जयपूर आणि शिमलामध्ये बँकांना सुट्टी असेल.
31 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन /श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोलमुळं देहरादून, गंगटोक, कानपुर, कोच्चि,लखनऊ आणि तिरुवनंतपुरम या ठिकाणी बंद असणार आहेत.
Success story | शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीरतून अवघ्या ४५ दिवसात घेतलं १६ लाखांचं उत्पन्न