Koyna Dam । पाटण : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुबलक प्रमाणात पाऊस (Rain in Maharashtra) झाल्याने ठिकठिकाणी पेरण्यांची लगबग पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे (Rain) नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. (Latest Marathi News)
YouTube Account। सावधान! तुम्हीही यूट्यूब वापरताना करताय का ही चूक? वेळीच थांबा नाहीतर..
कोयना धरण क्षेत्रात पावसाने (Heavy Rain in Koyna Dam) जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे कोयना (Koyna) धरणाचा एकूण पाणीसाठा ७६.५९ टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणातून प्रतिसेकंद २२ हजार ६७८ क्युसेक पाण्याची आवक होत असून आनंदाची बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये कोयनानगर येथे १३२ मिलिमीटर, नवजाला १७० मिलिमीटर तर महाबळेश्वरला (Mahabaleshwar) एकूण ११० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Rohit Pawar। रोहित पवारांच्या टी-शर्टवरून अधिवशेनात रंगली चर्चा, अजूनही ‘या’ मागणीवर ठाम
दरम्यान, सकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. परंतु, पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील आठवड्यापासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी-नाले तुडुंब वाहत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.