Rain in Maharashtra । राज्यात आज पुन्हा मुसळधार पाऊस! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Heavy rain again today in the state! Orange alert in 'these' districts including Pune

Rain in Maharashtra । राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे. परंतु अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे (Rain Update) प्रमाण खूप कमी आहे. तर काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अशातच आज हवामान खात्याकडून (IMD) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे. (Latest Marathi News)

Pandharpur News । ‘विठुरायाचे दर्शन घ्यायचंय? पैसे द्या…’; पंढरपुरात भाविकांना लूटणाऱ्या एजंटना पकडले रंगेहाथ

हवामान खात्याने आज कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert in Pune) जारी केला आहे. तसेच संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. येत्या ३-४ दिवसात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Koyna Dam । दिलासादायक! संततधार पावसामुळे कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

परंतु, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस पडला नसल्याने या भागातील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

मांडवगणमध्ये रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता रोको करून खड्यात वृक्षारोपण करून BNC अहमदनगर आणि मांडवगण ग्रामपंचायत यांचा निषेध करण्यात आला

Spread the love