Jitendra Awad । मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) आतापर्यंतचा सर्वात मोठा बंड केला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत त्यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडानंतर पक्षात अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट पडले आहेत. शरद पवारांचे अनेक जवळचे लोक अजित पवार गटामध्ये गेले आहे. बंडानंतरही अनेक पदाधिकारी अजित पवारांच्या गटात जात आहेत. (Latest Marathi News)
जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे हे अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. ते सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. परंतु आज ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. आज त्यांचा वाढदिवस (Jitendra Awad Birthday) आहे. एकीकडे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे आव्हाड यांनी लोकांना भेटणे टाळले आहे. उलट आज ते आज रात्री १२ वाजेपर्यंत अज्ञातस्थळी जाणार आहे.
Prithvi Shaw । पृथ्वी शॉच्या अडचणी संपता संपेना! पहा व्हायरल व्हीडिओ
त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आव्हाड यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. “५ ऑगस्ट, माझा वाढदिवस. लोक उत्साहाने मला भेटायला येऊन शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या भावना मनापासून व्यक्त करत आहेत. ते खूप हृदयस्पर्शी असतं. संपूर्ण वर्षभराची ताकत या तारखेला मिळते. परंतु मला माफ करा. कारण ह्या ५ तारखेला मी कोणालाही भेटणार नसून वाढदिवसही साजरा करणार नाही,” असे आव्हाड म्हणाले आहेत.
WI vs IND 1st T20I । अर्रर्र.. पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का
“देशात होणारी लोकशाहीची हत्या, राज्यात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार तसेच महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं पाहून मी खूप अस्वस्थ झालो आहे. त्यामुळे मला कोणाला भेटावे असे वाटत नाही,” असेही आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.