
NCP Pawar Camp Meeting । मागील महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फोडून राज्यात दुसरा राजकीय भूकंप घडवून आणला. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले अचानक सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय संघर्ष आणखी पेटला. त्यांनी केवळ पक्षचं फोडला नाही तर त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. जवळचे नेते अजित पवारांसोबत गेल्याने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) खूप मोठा धक्का बसला आहे.
Sania-Shoaib Divorce । सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
तरीही शरद पवार खचले नाहीत. त्यांनी पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर वाय बी चव्हाण सेंटर (YB Chavan Centre) येथे शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली दुसऱ्या बैठकीचे आयोजन केले आहे. १५ ऑगस्टनंतर शरद पवार राज्यभर दौरे करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत समजा पक्षाचे चिन्ह गेलं तर ते दुसरं कोणतं असावं तसेच प्रतिज्ञापत्राबाबत चर्चा होऊ शकते.
Agriculture News | कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
परंतु, आजच या गटाची बैठक होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत विरोधकांची आघाडी इंडिया आणि महाविकास आघाडीच्या आगामी रणनीतीवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते उपस्थित राहतील.
Jitendra Awad । “मला माफ करा”, जितेंद्र आव्हाड जाणार अज्ञातस्थळी; फोनही बंद, जाणून घ्या यामागच कारण?