Genelia’s birthday । रितेश आणि जिनिलीया यांची जोडी सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या दोघांची जोडी मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी 2012 मध्ये लग्न केले आहे. रितेशला प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे साथ दिल्यामुळे त्याने बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास रोमँटिक फोटो शेअर करत जिनिलीयाच्याचे कौतुक केले आहे.
पुण्यात फिरायला जात असाल तर नक्की खा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पाहूनच तोंडाला सुटेल पाणी
जिनिलीयाचा आज ३६वा वाढदिवस आहे. त्यामुळे बायकोच्या वाढदिवसानिमित्त रितेशने एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट करत त्याने लिहिले की, तू “माझी खूप चांगली जिवलग मैत्रीण माझ्या कठीण काळात मला कायम साथ देणारी माझी सर्वात चांगली सहकारी आहेस. तू मला कायम प्रोत्साहन दिलेस My Everything तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” (Genelia’s birthday)
Salman Khan । भाईजानलाही ‘बार्बी’ची भुरळ! हटके लूक पाहून नेटकरी कोड्यात, पहा व्हायरल व्हिडिओ
त्याचबरोबर तो लिहितो की, “माझे जीवन सुखी आणि समृद्ध केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार माझी बायको, माझं वेड, लव यू जिनिलीया अशी रितेशने इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांनी देखील या फोटोवर कमेंट करत जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.