मुंबई : राज्यात येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकां मुळे सगळेच राजकीय पक्ष आता विजयाच्या तयारीला लागले आहेत. त्यात या तयारीला मुहूर्त लागला गणेशोत्सवाचा. कारण गणेशोत्सवाच्या माध्यमातून सदिच्या भेटींची राजकीय पेरणी सुरू झाली आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध विरोधी पक्षांचे नेते या भूमिकेत दिसले. या भेटीच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेसुद्धा मागे राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यापासून शिवसेनेत फूट उभी पडली .दरम्यान ही फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.
Aditya Thackeray: शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता निर्लज्जपणा वाढलाय, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
आता गणेशोत्सवात आदित्य ठाकरे मुंबईतील विविध मंडळांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरच्या बाप्पांना भेटी देत आहेत. अशातच
आदित्य ठाकरे गिरगावमधील एका गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी पोहोचले होते.यावेळी एका चिमुकल्यानं त्यांना पाहिलं.पुढे त्या चिमुकल्याने ‘शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे…’अशी घोषणा दिली.
आनंददायक! शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के अनुदान; वाचा सविस्तर
चिमुकल्याच्या या घोषणेने तेथील सगळेच जण काही वेळासाठी त्याच्याकडे पाहत राहिले. पाहतच राहिले नाही तर आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य पाहायला मिळालं. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आदित्य ठाकरेंनीही चिमुकल्याचा हात पकडून त्याला गणेश दर्शनाला सोबत नेलं. आदित्य ठाकरेंनी चिमुकल्याला तू कितवीस आहेस, असं विचारलं. शेवटी या चिमुरड्यासोबत त्यांनी फोटोसेशनही केलं.