“सीएमआयई” अहवालात दिसून येते भयावह परिस्थिती; बेरोजगारीचा प्रश्न दिवसागणिक उग्र रूप धारण करतोय

"CMIE" report shows alarming situation; The problem of unemployment is getting worse day by day

दिल्ली : देशातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसागणिक उग्र रूप धारण करत आहे. नुकताच देशातील बेरोजगारीविषयीची ही भयावह वास्तव स्थिती मांडणारा ताजा अहवाल ‘सीएमआयई’ म्हणजेच ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकोनॉमी’ या संस्थेने जाहीर केला आहे. या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात देशातील बेरोजगारीच्या दराने नवा उच्चांक गाठून असून तो 8.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. एका महिन्याच्या तुलनेत जुलैपेक्षा ऑगस्ट महिन्यात देशातील रोजगार तब्बल 20 लाखांनी घटला व 39.46 वर घसरला आहे.

Ajit Pawar: अजित पवारांनी भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठींवर काढला चिमटा; म्हणाले, “याआधी…”

जुलै महिन्यात बेरोजगारीचा दर 6.8 टक्के इतका होता आणि 39.7 कोटी लोकांसाठी रोजगार उपलब्ध होता. या अहवालानुसार सध्या दर महिन्याला रोजगाराच्या संधी तब्बल 20 लाखांनी कमी होत आहेत. तसेच सरकारी वा खासगी कुठल्याही क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होत नसल्याने देशातील मोठा सुशिक्षित तरुणवर्ग या परिस्थितीजन्य हतबलतेच्या खाईत लोटला जातोय. बेरोजगारांच्या या फौजांवर वैफल्यग्रस्त होण्याची वेळ आली आहे.

Aditya Thackeray: शिंदे गटाच्या राजकारणामुळे आता निर्लज्जपणा वाढलाय, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

“‘सीएमआयई’ने जाहीर केलेल्या ताज्या अहवालावरून देशातील बेरोजगारीची वाढती संख्या विस्फोटक वळणावर असल्याचेच सिद्ध झाले आहे. तथापि, केंद्रीय सरकार मात्र बेरोजगारीच्या समस्येवर समाधान शोधण्याऐवजी अर्थव्यवस्थेचा गाडा बघा कसा वेगाने धावतो आहे, याचे आभासी चित्र रंगवण्यात मशगूल आहे. जीएसटीचे संकलन कसे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे आणि देशाच्या औद्योगिक उत्पादनात कशी झपाटयाने वाढ होते आहे, याचे ढोल बडवणारे आकडे जाहीर करणारे सरकार बेरोजगारीच्या (Unemployment) भयावह संकटाविषयी काहीच का बोलत नाही? देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे”,असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *