
Health News । अनेक जण एकमेकांचे उष्ट अन्न खातात त्याचबरोबर उष्ट अन्न खाल्ल्याने प्रेम वाढते असा अनेकांचा समज आहे. अनेक जण आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांच्या ताटातलं अन्न खाण्यास पसंती देतात. कारण की यामध्ये प्रेम वाढतं असं म्हटलं जातं. मात्र एकमेकांचे उष्ट खाणं खाल्ल्यामुळे प्रेम वाढेल की नाही हे सांगता येत नाही मात्र आजाराचा धोका नक्कीच वाढेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हनीमूनसाठी गेलेली नववधू हॉटेलमधून अचानकच झाली गायब… धक्कादायक माहिती आली समोर
उष्ट खाऊ नका आरोग्य तज्ञांचा सल्ला (health specialist)
उष्ट खाल्ल्याने बऱ्याच आजारांचा धोका वाढत असल्याचं आरोग्य तज्ञांचे म्हणणं आहे. त्यामुळे कोणीही कोणाचेही उष्ट खाऊ नका असा सल्ला देखील आरोग्य तज्ञ देतात. जर तुम्ही कोणाचेही उष्ट खात असाल तर तुमच्या आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! साखरेचे दर वाढणार की कमी होणार? निर्यातीवर बंधने येण्याची शक्यता
पोषक तत्वांची कमतरता
तुम्ही जर दुसऱ्यांच्या ताटामध्ये अन्न खात असाल तर तुम्हाला पचनाची समस्या नक्कीच होईल. कारण की, दुसऱ्यांच्या ताटात जेवताना त्याने ते ताट स्वच्छ धुतले आहे की नाही हे देखील आपल्याला माहीत नसते. त्यामुळे अनेक विषाणू आपल्या पोटात प्रवेश करू शकतात. यामुळे आपल्याला पचनाचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आपण दुसऱ्याच्या ताटात अन्न खातो त्यावेळी आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक द्रव्य मिळत आहेत. त्यामुळे देखील शरीरात पोषक द्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते.
सरकारची मोठी घोषणा! वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 25 लाखांची मदत
जेवताना या गोष्टी लक्षात घ्या
- जेवणापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा
- जेवताना चमचा किंवा इतर भांड्याचा वापर करून अन्न वाडा
- जर एखाद्याला कोणत्याही विशिष्ट अन्नपदार्थाने एलर्जी होत असेल तर त्याबद्दल त्या व्यक्तीला सांगा
- उष्टं खाणे शक्यतो टाळा असे केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.
Sharad Pawar । भाजपसोबत जाणार का? शरद पवार स्पष्टच बोलले, “आगामी निवडणुका ..”