Pune Person Threatened । राज्यात मागील काही दिवसांपासून दिग्गज राजकीय नेत्यांना धमकी (Threatened) देण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नुकताच पुणे (Pune) शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला आहे. या ईमेलवरून सगळ्यांना धक्का बसला आहे. कारण यामध्ये देशात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट (Bomb blast) घडवून आणला जाईल, अशी धमकी दिली आहे. (Latest Marathi News)
इतकेच नाही तर यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना देखील बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली आहे. एम. ए. मोखीम असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट (Serial Bomb Blast) करण्याच्या प्रयत्नात आहे. मी हिंदूंना आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन. “आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो”, अशी धमकी या मेलमधून दिली आहे.
Share Market । गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! लवकरच शेअर बाजार गाठणार नवीन उच्चांक
याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये दहशतवादी आढळून येत आहेत. अशातच आता नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच बॉम्बनं उडवून देण्याचा मेसेज आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही पहा