Onion Market Price । कांदा (Onion) हे एक असे पीक आहे ज्याला भाव (Onion Price) असो व नसो, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या वर्षी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कारण यावर्षी कांद्याला खूप कमी भाव मिळत आहे. अक्षरशः शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आहे. महत्त्वाचे म्हणजे कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारने (Central Govt) कोणतेच धोरण ठरवलेले नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. (Latest Marathi News)
फेब्रुवारी ते जून महिन्या दरम्यान कांदा निर्यात बंदी होती. त्याशिवाय देशांतर्गत कांद्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कांद्याची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. अशातच तज्ज्ञांच्या मतानुसार या महिन्याच्या शेवटी कांद्याचे भाव वाढतील (Onion Price Hike). असे झाले तर शेतकऱ्यांना या फायदा होईल.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये आज झालेल्या लिलावात कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. या मार्केटमध्ये आज 348 क्विंटल कांदा आवक झाली असून आजच्या लिलावात कांद्याला किमान 1200 रुपये प्रति क्विंटल, कमाल 3200 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 2200 रुपये प्रति क्विंटल भाव नमूद केला आहे.
Share Market । गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! लवकरच शेअर बाजार गाठणार नवीन उच्चांक
दरम्यान, राज्यात टोमॅटोचे दर अजूनही गगनाला भिडले आहेत. अनेक टोमॅटो टोमॅटो उत्पादक शेतकरी लखपती झाले आहेत. अशातच आता टोमॅटो पाठोपाठ कांद्याचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील.
हे ही पहा