Milk Price । दूध दरावरून किसान सभा आक्रमक, 35 रुपयांचा दर देण्याची मागणी

Kisan Sabha Aggressive on milk price, demand Rs 35 price

Milk Price । राज्यात मागील काही दिवसांपासून दुधाच्या (Milk Price Hike) प्रश्नावरून वातावरण खूप तापले आहे. दुधाला निश्चित दर (Milk Rate) देण्यात यावा यासाठी पशुपालकवर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर त्यांना 34 रुपये प्रतिलिटर दर दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु तरीही त्यांना दरवाढ मिळाली नाही. (Latest Marathi News)

ITR Filing 2023 । करदात्यांना मोठा झटका! वेळेत ITR दाखल केला तरीही भरावा लागणार 5,000 रुपये दंड, जाणून घ्या यामागचं कारण

त्यावरून आता किसान सभा आक्रमक झाली आहे. सरकारने आता यामध्ये हस्तक्षेप करुन रिव्हर्स रेट (Reverse rate) पूर्ववत करावेत, गाईच्या दुधाला कमीत कमी 35 रुपये दर मिळावेत अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. रिव्हर्स रेट वाढवून दूध दर पाडण्यास सरकारची मूकसंमती आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (Milk Price Falls Down)

Tomato Rate : टोमॅटोच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेपाळमधून भारतात टोमॅटोची आयात; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

त्याशिवाय सरकारकडून पशुखाद्याच्या दरात 25 टक्क्यांची कपात करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, हे दर कमी करण्याऐवजी पशुखाद्याच्या दरात 1 ऑगस्टपासून पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता दूध दर वाढवण्यासोबतच पशुखाद्याचे दर कमी करावी,अशी मागणी किसानसभा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

Virat Kohli । इंस्टाग्राम कमाईवर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी इतके पैसे…”

दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जर दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला निश्चित हमीभाव तसेच पशुखाद्याच्या दरात कपात झाली नाही तर येत्या काळात राजकीय वातावरण पुन्हा तापू शकते.

Sanjay Raut । नवाब मलिकांना जामीन कसा मिळाला? राऊत म्हणाले, नवीन इंजेक्शन घेतले …

Spread the love