राजकीय वर्तुळात कधी काय होईल ते सांगता येत नाही. मागील महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सर्वात मोठी फूट पाडली. त्यामुळे सर्वांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवारांसोबत गेलेल्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजूनही काही कार्यकर्ते अजित पवार गटात सहभागी होत आहेत. (Latest Marathi News)
flooded । पूरग्रस्त भागातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत; लवकर मदत जाहीर केली नाही तर आंदोलनाचा इशारा
अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या घरी ही बैठक पार पडली. दरम्यान, आज अजित पवार चांदणी चौकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली.
Milk Price । दूध दरावरून किसान सभा आक्रमक, 35 रुपयांचा दर देण्याची मागणी
दरम्यान, मागील काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. त्यात आज या दोन नेत्यांची भेट झाल्याची माहिती आहे. त्यांची ही भेट नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याची माहिती अजूनही समोर आली नाही.