
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे.न्यायालयाने संजय राऊतांच्या कोठडीमध्ये 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.आज राऊत यांना पुन्हा PMLA न्यायालयात हजर केले असता या कोठडीत वाढ केली आहे.तसंच, न्यायालयाने राऊत यांना संसदीय कामकाजाबाबत पत्रांवर सह्या करण्यास परवानगी दिली आहे.संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला नसल्याने ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.दरम्यान आज पुन्हा न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत वाढ केली आहे.
Gulkand: गुलकंद खाल्ल्याने शरीरास होतात हे फायदे; वाचा सविस्तर
नेमक काय आहे गोरेगाव पत्राचाळ प्रकरण
2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला.मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला. दरम्यान हा करार म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या तीन पार्टीत करार झाला.
Sanjay Raut: ‘या’ अधिकाऱ्यांच्या जबाबामुळेच संजय राऊत अडचणीत, नेमक काय आहे प्रकरण
या करारात 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं.पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1 हजार 34 कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली.