Sharad Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली आणि भाजप सोबत हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अजित पवारांना वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ लागले तुम्ही भाजपासोबत हात मिळवणी का केली? असे अनेक प्रश्न अजित पवार यांना विचारले जाऊ लागले, राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत हात मिळवणी केले असे अजित पवारांकडून वारंवार सांगितले गेलं. मात्र शरद पवार यांनी पक्ष फुटी बाबत कोणतेही वक्तव्य केले नव्हते. मात्र ईडीच्या कारवाईच्या धाकाने अजित पवार गट भाजपासोबत गेला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर आज शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Share Market । गुंतवणूकदारांनो, करायची असेल चांगली कमाई तर ठेवा ‘या’ शेअर्सवर लक्ष
ईडीच्या कारवाईमुळेच आमचे लोक भाजपसोबत गेले असल्याच गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या बाबतीत तोच प्रश्न केला जात असल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे व्यक्त केले आहे. सत्तेचा गैरवापर करून मोठी पाऊले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना देखील येडीच्या नोटीस आल्या त्यामुळे ते भाजपमध्ये गेले असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
Johny Lever Birthday । जॉनी लिव्हर दिवसाला कमावत होते ५ रुपये, जीवही देण्याचा प्रयत्न केला पण..
मोदी सरकारवरही केली टीका
त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मणिपूरच्या हिंसेवरून मोदी सरकारवर देखील टीका केली आह. मणिपूर हा विषय मणिपूर पर्यंतच मर्यादित नाही पूर्व-पश्चिमेच्या राज्यांना लागून इतर देशांच्या सीमा आहेत. त्यामुळे मणिपूरकडे सरकार लक्ष देत नसेल तर ती खूप चिंतेची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये मणिपूरवर बोलले मात्र ते अत्यंत कमी वेळात बोलले असे शरद पवार म्हणाले आहेत.