
Health Insurance । सध्याच्या काळात आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा झाला आहे. कारण आजारांमध्ये वाढ झाली आहे. एखाद्या रुग्णालयात कधी आणि किती खर्च होऊ शकतो हे सांगता येत नाही. तसेच वेळेसोबतच हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियमही (Health Insurance Premium) वाढला आहे. इन्शुरन्सची सर्वात जास्त गरज ज्येष्ठ नागरिकांना (Senior citizens) आहे. (Latest Marathi News)
Jayakwadi Dam Water Storage । मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट, जायकवाडी धरणात फक्त 34 टक्के पाणीसाठा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियम (Health Insurance Policy Premium) कमी ठेवण्याचे खूप मार्ग आहेत. परंतु, अनेकांना त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy Premium) घेत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमची फसवणूक होऊन तुम्ही खूप मोठ्या संकटात येऊ शकता. कोणत्या आहेत या गोष्टी? जाणून घ्या.
जाणून घ्या पूर्वी असणाऱ्या रोगांसंबंधी नियम आणि अटी
अनेक आरोग्य विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसींमध्ये असलेल्या पूर्वी असणाऱ्या रोगांसंबंधी काही अटी ठेवतात. त्यामुळे विमा घेण्यापूर्वी त्या पॉलिसी अंतर्गत कोणते आजार कव्हर केले जातील हे माहिती असणे खूप गरजेचे आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शेततळ्यासाठी अर्ज सुरु; ‘या’ ठिकाणाहून करा अर्ज
प्रीमियम आणि बजेट
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यासाठी जास्त पैसे लागतात. त्यामुळे त्यांनी विमा घेण्यापूर्वी त्यांचे बजेट आणि प्रीमियम पाहावा.
जाणून घ्या सह-पेमेंट आणि उप-मर्यादा
उपमर्यादा म्हणजेच पॉलिसीधारक एका विशिष्ट प्रक्रियेसाठी पात्र असणारी कमाल रक्कम. सह-पेमेंट म्हणजे दाव्याच्या काही भागासाठी स्वतःच्या बजेटमधून भरावे लागणारे पैसे होय. विमा कंपन्या हे भिन्न पेमेंट आणि उप-मर्यादा देतात. त्यामुळे असा विमा निवडावा जो किमान पेआउट आणि उपमर्यादा देऊ शकतो.
Weather Update । राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक! विजांच्या गडगटांसह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
दवाखान्यात दाखल झाल्यानंतर होणारा खर्च
हे लक्षात ठेवा की या खर्चासाठी पात्रता कालावधी 60 -90 दिवसांचा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, अनेक विमा कंपन्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या खर्चासाठी रक्कम मर्यादित करण्याची शक्यता असते.
Krishi Seva Kendra । घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्रासाठी परवाना, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस