राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने गोरगरीबांसाठीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर बाकी देखील मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत.
Banana with Milk । दूध आणि केळीचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी कितपत फायद्याचे आहे? वाचा
वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
- राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव.
- गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात #आनंदाचाशिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा.
- आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार.
- मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी.
- महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द.
- केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.
- सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे.
- दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.
- मंडणगड येथे दिवाणी न्यायालय.
Lumpy Disease । सरकारकडून पशुधनासाठी 170 कोटींचा खर्च, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती