
Onion Price । पुणे : कांदा (Onion) आणि टोमॅटो (Tomato) ही दोन अशी पिके आहेत, ज्याला दरवर्षी भाव मिळो ना मिळो त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी मुसळधार पावसाचा फटका टोमॅटोच्या किमतीवर (Tomato Rate) दिसून आला. बाजारातील आवक कमी झाल्याने टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोपाठोपाठ कांद्याच्याही किमतीत (Onion Rate) वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु बाजारात या उलट चित्र पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)
Traffic Rule । काय सांगता? हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकाला ठोठावला दंड
काही दिवसांपूर्वी कांद्याच्या किमतीत वाढ केली जाणार अशा बातम्या माध्यमांमधून देण्यात येत होत्या. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, आज पुणे जिल्ह्यातील मंचर बाजार समितीत कांद्याचे दर कमी (Onion rate falls down) झाले आहेत. जवळपास 40 ते 50 टक्क्यांनी घसरण घसरण झाल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे.
Gadar 2। धक्कादायक, पाकिस्तानी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर हल्ला
बाजार समितीत 42 हजार पिशव्यांची आवक झाल्याने दर 17 ते 22 रुपयांपर्यंत आला आहे. तर लासलगावमध्ये कांद्याचे प्रतिक्विंटल सरासरी दर 2250 रुपये आहे. लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याची माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे. यासाठी एकूण 30 लाख 36 हजार 476 शेतकरी पात्र ठरले आहेत.
Chandrayaan 3। चंद्राजवळ पोहोचूनही ‘चांद्रयान 3’ला 23 तारखेपूर्वी लँडिंग शक्य नाही, कारण…