
PPF Investment । पीपीएफ ही योजना (PPF) दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. जो आकर्षक व्याज दर (PPF Interest Rate) आणि गुंतविलेल्या रकमेवर निश्चित परतावा देत असतो. विशेष म्हणजे यावर मिळालेले व्याज आणि परतावा प्राप्तिकर कायद्याअंतर्गत करपात्र नसतात. त्यामुळे अनेकजण या योजनेमध्ये गुंतवणूक (PPF Investment Scheme) करत असतात. तुम्ही हे खाते कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये चालू करू शकता. (Latest Marathi News)
Onion Price । कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पुन्हा घसरले दर
हे आहेत फायदे
मॅच्युरिटीनंतर यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले नाही तरी तुम्हाला व्याज (PPF Interest) मिळते. तुमचे पीपीएफ खाते (PPF Account) बंद झाले तर तुमचे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतात. मॅच्युरिटीवर देण्यात येणारी रक्कम आणि व्याज पूर्णपणे करमुक्त असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या योजनेत 15 वर्षानंतरही PPF मध्ये गुंतवणूक करता येते.
Traffic Rule । काय सांगता? हेल्मेट घातले नाही म्हणून रिक्षाचालकाला ठोठावला दंड
परतावा
या योजनेतील तुमचे खाते मॅच्युरिटीनंतर चालू राहते. त्यामुळे तुम्ही त्यात गुंतवणूक करावीच असे नाही. मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांसाठी आपोआप वाढत जातो. सध्या या योजनेमध्ये 7.1 टक्के व्याज गुंतवणूकदारांना दिले जात आहे. जोखीम मुक्त परतावा, निश्चित उत्पन्नाची हमी आणि करमुक्त लाभ असे पीपीएफ खात्याचे फायदे आहेत.
Gadar 2। धक्कादायक, पाकिस्तानी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर हल्ला
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही एक सरकार-समर्थित योजना आहे. गुंतवणूक बाजाराशी संबंधित नसल्याने अनेक लोकांच्या गुंतवणुकीच्या गरजा संरक्षित करण्यासाठी ती योजना हमीपूर्ण आणि निश्चित परतावा देते. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून लाभ घेऊ शकता.
Chandrayaan 3। चंद्राजवळ पोहोचूनही ‘चांद्रयान 3’ला 23 तारखेपूर्वी लँडिंग शक्य नाही, कारण…