
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shaha) मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शनही घेतले.दरम्यान अमित शहा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं (bjp) लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल अशी घोषणा भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली आहे. अमित शहा यांनी भाषणात वेळोवेळी उद्धव ठाकरेंवर (uddhav Thackeray)आरोप केले आहेत.
पुढे भाषणात अमित शहा म्हणाले की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला धोका दिला. कारण २०१४ मध्ये केवळ दोन जागांसाठी त्यांनी युती मोडली.ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही.आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार.आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला.
उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत अमित शाह यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उधळला. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले.
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका, म्हणाले…
राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही असा थेट संदेश अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे. महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारणं आपल्याला संपवायचं आहे.शिवसेना पक्ष आज छोटा झाला यासाठी तुम्हीच जबाबदार आहात असंही अमित शाह यांनी आपल्या भाषणात म्हटलं.