Viral Video । धबधब्याखाली आंघोळ करणे बेतले जीवावर, अंगावर पडला ढिगारा; पहा धक्कादायक व्हिडिओ

Bathing under the waterfall was fatal, debris fell on the body; Watch the shocking video

Viral Video । राज्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने (Rain) ब्रेक घेतला आहे. त्यामुळे अनेकजण निसर्गाचे नयनरम्य दर्शन घेण्यासाठी फिरायला जात आहेत. त्यामुळे धबधबे आणि पर्यटनस्थळी (Tourist place) प्रचंड गर्दी होत आहे. परंतु बऱ्याच वेळा अति उत्साहाच्या नादात कधी कधी फिरायला जाणे अगदी जिवावरही बेतत असते. जर तुम्हीही फिरायला जात असाल, तर सावधगिरी बाळगा. (Latets Marathi News)

Politics News | “प्रत्यक्षात मात्र हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला”, दिलीप वळसे-पाटलांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे खरमरीत उत्तर

सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तो पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ उत्तराखंड राज्यातील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की काही पर्यटक धबधब्याखाली अंघोळ करत आहेत. अचानक त्यावेळी एक ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर येऊन पडतो. व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्तीदेखील भयानक दृश्य पाहून घाबरते. (Video viral on social media)

उत्तराखंड राज्यातील चमोली पोलिसांनीच ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. सध्या या राज्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तरीही पर्यटक फिरायला गेल्यानंतर योग्य ती खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे पोलिसांनीच धबधब्यापासून लांब राहण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Weather Update । पुन्हा पावसाचे थैमान! हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, हवामान खात्याकडून या राज्यात 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह येथे 115.6 ते 204.4 मिमीपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

तुमच्या गावात कोणी जमीन खरेदी केली आणि कोणी विकली? एका मिनिटात समजणार, जाणून घ्या कसं ते?

Spread the love